टॉप ५: भारत-विंडीज संघातील दुसऱ्या वनडेत होणार हे खास ५ विक्रम

पोर्ट ऑफ स्पेन। वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात दुसरा वनडे सामना आज(11 ऑगस्ट) क्विन्स पार्क ओव्हल स्टेडीयमवर होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार असून या सामन्यात दोन्ही संघाच्या खेळाडूंना काही खास विक्रम करण्याची संधी आहे.

वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात होणाऱ्या दुसऱ्या वनडे सामन्यात होऊ शकतात हे खास विक्रम –

– आजचा सामना ख्रिस गेलचा कारकिर्दीतील 300 वा सामना आहे. तो 300 वनडे सामने खेळणारा वेस्ट इंडीजचा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे.

-गेलने या सामन्यात जर 9 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारा वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू ठरेल.सध्या हा विक्रम लारा यांच्या नावावर असून त्यांनी 299 वनडे सामन्यात 10405 धावा केल्या आहेत. तसेच गेलच्या नावावर सध्या 299 वनडे सामन्यात 10397 धावा आहेत.

-विराटने जर आज 19 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो वेस्ट इंडीज विरुद्ध सर्वाधिक वनडे धावा करणारा फलंदाज ठरेल आणि पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद यांच्या विक्रमाला मागे टाकेल. विराटने सध्या वेस्ट इंडीजविरुद्ध 1912 धावा केल्या आहेत. तर मियाँदाद यांनी त्यांच्या कारकिर्दीत वेस्ट इंडीजविरुद्ध वनडेमध्ये 1930 धावा केल्या आहेत.

-विराटने या सामन्यात जर 88 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो वेस्ट इंडीज विरुद्ध 2000 वनडे धावा पूर्ण करणारा पहिलाच क्रिकेटपटू ठरेल.

-शाय होपला भारताविरुद्ध वनडेमध्ये 500 धावा पूर्ण करण्यासाठी 58 धावांची गरज.

– कुलदीप यादव वनडेमध्ये 100 विकेट्स पूर्ण करण्यापासून केवळ 6 विकेट्स दूर. तसेच त्याला वनडेमध्ये सर्वात जलद 100 विकेट् घेणारा भारतीय गोलंदाज होण्याचीही संधी. सध्या त्याने 52 वनडे सामन्यात 94 विकेट्स आहेत.

तसेच सध्या वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी वनडेत सर्वात जलद 100 विकेट् घेणारा भारतीय गोलंदाज आहे. शमीने 56 वनडे सामन्यात 100 वनडे विकेट्सचा टप्पा गाठला होता.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

विंडीज विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यासाठी अशी आहे ११ जणांची टीम इंडीया

किंग कोहली हा मोठा पराक्रम करण्यापासून केवळ १९ धावा दूर

ऑस्ट्रेलिया, इंग्लंड नाही तर थायलंडच्या महिला क्रिकेट संघाने केला हा मोठा विश्वविक्रम