विंडीज विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यासाठी अशी आहे ११ जणांची टीम इंडीया

पोर्ट ऑफ स्पेन। आज(11 ऑगस्ट) वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात दुसरा वनडे सामना होणार आहे. हा सामना क्विन्स पार्क ओव्हल स्टेडीयमवर होणार असून या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी भारतीय संघाने 11 जणांच्या संघा कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे या सामन्यात पहिल्या वनडे सामन्यातील 11 जणांचा संघत कायम असेल. यामुळे केएल राहुल, नवदीप सैनी, मनीष पांडे आणि युजवेंद्र चहल यांना आजच्या सामन्यासाठी बाहेर बसावे लागणार आहे.

तसेच चौथ्या क्रमांकावर यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत फलंदाजी करेल. तर श्रेयस अय्यर पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करेल असे भारताचा कर्णधार विराट कोहलीने स्पष्ट केले आहे.

त्याचबरोबर वेस्ट इंडीजने त्यांच्या 11 जणांच्या संघात 1 बदल केला आहे. त्यांनी फॅबिएन ऍलेन अनफिट असल्याने ओशान थॉमसला संधी दिली आहे.

तसेच आजचा सामना ख्रिस गेलचा कारकिर्दीतील 300 वा वनडे सामना आहे. तो 300 वनडे सामने खेळणारा वेस्ट इंडीजचा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे.

ह्या वनडे मालिकेतील पहिला सामना 13 षटकांचा खेळ झाल्यानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला होता.

असे आहेत 11 जणांचे संघ –

भारत – रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टिरक्षक), केदार जाधव, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, खलील अहमद.

वेस्ट इंडीज – इव्हिन लुईस, ख्रिस गेल, शाय होप (यष्टिरक्षक), निकोलस पूरन, शिमरॉन हेटमेयर, रोस्टन चेस, जेसन होल्डर (कर्णधार), कार्लोस ब्रेथवेट, ओशान थॉमस, शेल्डन कोट्रेल, केमार रोच.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Mahअसा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

किंग कोहली हा मोठा पराक्रम करण्यापासून केवळ १९ धावा दूर

ऑस्ट्रेलिया, इंग्लंड नाही तर थायलंडच्या महिला क्रिकेट संघाने केला हा मोठा विश्वविक्रम

रिषभ पंत, कुलदीप यादव करत आहेत अशा अनोख्या प्रकारे सराव, पहा व्हिडिओ