पहिली कसोटी: भारताची पराभवाच्या दिशेने वाटचाल सुरु, फलंदाजांची हाराकिरी

केप टाउन । भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघांची पराभवाच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे. संघाने २६ षटकांत ६ बाद ८१ धावा केल्या असून सर्व प्रमुख फलंदाज तंबूत परतले आहे.

शिखर धवन (१६), मुरली विजय (१३), चेतेश्वर पुजारा (४), विराट कोहली (२८), रोहित शर्मा (१०) आणि हार्दिक पंड्या (१) हे फलंदाज बाद झाले आहेत. सध्या खेळपट्टीवर वृद्धिमान सहा (८) आणि आर अश्विन (०) धावांवर खेळत आहेत.

दक्षिण आफ्रिकेकडून फिलॅन्डर (३), मॉर्केल (२) आणि रबडा (१) यांनी विकेट घेतल्या आहेत.