पहिली कसोटी: दक्षिण आफ्रिकेला ८वा झटका, ८ बाद १२४ अशी अवस्था

केप टाउन । भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटीच्या पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेची भारतीय गोलंदाजीसमोर बिकट अवस्था झाली आहे. ३९ षटकांत ८ बाद १२४अशी अवस्था झाली आहे.

भुवनेश्वर कुमारने केशव महाराजला बाद करत दुसऱ्या डावातील आपली पहिली विकेट घेतली आहे. भुवीने महाराजला यष्टीरक्षक सहाकडे झेल देण्यास भाग पाडले.

एका बाजूने सतत विकेट्स जात असल्या तर आफ्रिकेचा महान खेळाडू एबी डिव्हिलिअर्स एका बाजूने नेटाने किल्ला लढवत आहे. तो ४५ चेंडूत २९ धावांवर खेळत आहे.