दक्षिण आफ्रिकेला ५वा मोठा झटका, कर्णधार डुप्लेसी तंबूत

केप टाउन । भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटीच्या पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेची सकाळच्या सत्रात तिसरी विकेट गेली आहे. जसप्रीत बुमराहने आफ्रिकेचा कर्णधार फाफ डुप्लेसीला ५ चेंडूत ० धावेवर बाद केले.

बुमराहच्या चेंडूवर त्याने यष्टीरक्षक वृद्धिमान सहाकडे झेल दिला. यामुळे आफ्रिका संघ चांगलाच अडचणीत आला आहे. त्यांचे ३० षटकांत ५ बाद ८८ अशी अवस्था असून एकूण १६५ धावांची आफ्रिकेकडे आघाडी आहे.

विशेष म्हणजे आज शिखर धवनने डिकॉकला धावबाद करण्याची संधी दवडली. नाहीतर चित्र आणखी वेगळे दिसले असते.

सद्यस्तिथीत एबी डिव्हिलिअर्स १६ तर डिकॉक ८ धावांवर खेळत आहेत.