भारतीय संघाला ७वा धक्का, आर अश्विन तंबूत

सेंच्युरियन । दक्षिण आफ्रिका आणि भारत दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला ७वा धक्का बसला आहे. आर अश्विन ३ धावांवर बाद झाला आहे.

भारतीय संघ सध्या ७ बाद ९३ अशा खराब स्थितीत असून सध्या मैदानावर रोहित शर्मा २०वर तर मोहम्मद शमी ६ धावसंख्येवर खेळत आहे.

कालच्या ३ बाद ३५वरून आज भारतीय संघाने पुढे खेळायला सुरुवात केली. चेतेश्वर पुजारा आज १९ धावसंख्येवर धावबाद झाला तर पार्थिव पटेलही १९ धावसंख्येवर बाद झाला.

लुंगी न्गिडीने आज आर अश्विन (३) आणि हार्दिक पंड्याला(६) धावसंख्येवर डिकॉककडे झेल द्यायला भाग पाडले.