दक्षिण आफ्रिकेला ९वा झटका, आघाडी २०७ धावांची

केप टाउन । भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटीच्या पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेची भारतीय गोलंदाजीसमोर बिकट अवस्था झाली आहे. ४०.४ षटकांत ९ बाद १३० अशी अवस्था झाली आहे.

भुवनेश्वर कुमारने केशव महाराजला बाद करत दुसऱ्या डावातील आपली पहिली विकेट घेतली. त्यानंतर पुढच्याच षटकात भुवीने मॉर्ने मॉर्केलला तंबूचा रस्ता दाखवला. त्याने मॉर्केलला २ धावांवर असताना वृद्धिमान सहाकडे झेल द्यायला भाग पाडले.

यष्टीरक्षक सहाने या सामन्यात एकूण ५ झेल घेतले आहेत. तर भुवीची ही डावातील दुसरी विकेट होती.