पहिली कसोटी: दक्षिण आफ्रिका संकटात, ७वा खेळाडूही बाद

केप टाउन । भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटीच्या पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी सकाळचे सत्र हे पूर्णपणे मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांच्या नावावर राहिले आहे.

मोहम्मद शमी आजच्या दिवसातील तिसरी विकेट घेताना दक्षिण आफ्रिकेची ७वी विकेट घेतली. त्याने व्हर्नोन फिलेन्डरला एलबीड्ब्लु केले. फिलेन्डर १० चेंडूत ० धावा काढून बाद झाला. विशेष म्हणजे यासाठी दक्षिण आफ्रिकेने डीआरएस घेतला.

शमीची ही दुसऱ्या डावातील तिसरी विकेट होती.

सद्यस्थितीत दक्षिण आफ्रिकेची ७ बाद ८७ अशी अवस्था सून त्यांच्याकडे १७५ धावांची आघाडी आहे.