जेव्हा रबाडाचा अफलातून यॉर्कर घेतो स्टोक्सच्या यष्ट्यांचा वेध

ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर: दक्षिण आफ्रिका सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून पहिल्या तीन कसोटी सामन्यांत १-२ अशी पिछाडीवर आहे. रोमहर्षक होत असलेले इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेमधील कसोटी सामने चर्चेचा विषय आहेत.

काल या दोन संघातील चौथी आणि शेवटची कसोटी सुरु झाली. पहिल्या दिवशी इंग्लंडने ९० षटकांत ६ बाद २६० अशी कामगिरी केली आहे. परंतु दिवसभर चर्चा झाली ती रबाडाच्या अफलातून यॉर्करची. सध्या जबदस्त फॉर्मात असणाऱ्या बेन स्टोक्सला २२ वर्षीय रबाडाने असा काही चेंडू टाकला की त्याने कधी स्टोक्सच्या यष्टीचा वेध घेतला समजलेही नाही.

पहा: