दुसरी कसोटी: श्रीलंकेला मोठा झटका

कोलंबो: येथे चालू असलेल्या श्रीलंका विरुद्ध भारत दुसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी भारताने आपला पहिला डाव ९ बाद ६२२वर घोषित केला आहे. दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या श्रीलंका संघाला दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मोठा झटका बसला.

श्रीलंकेचा सलामीवीर उपुल तरंगा ० धावा काढून परतला. त्याला अश्विनने केएल राहुल करावी झेलबाद केले.

याबरोबर दुसऱ्या क्रमांकावर गोलंदाजीला येऊन सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम अश्विनने आपल्या नावावर केला. हा विक्रम यापूर्वी कॉलिन बायथे (६०), रंगाना हेराथ (६०) आणि अश्विनच्या नावावर होता.