क्रिकेटला कबड्डी टाकणार मागे ??

0 75

प्रो कबड्डीच्या मोसमाच्या उद्घाटनाच्या दिवशी सकाळी भारतीय कबड्डी संघाचा कर्णधार, प्रो कबड्डीचा चेहरा असणारा, भारताला विश्वचषक आणि दोन आशियाई खेळात सुवर्ण पदक जिंकून देणारा अर्जुन पुरस्कार विजयी खेळाडू अनुप कुमारने डीएनएला दिलेल्या मुलाखतीत खूप मनमोकळ्या गप्पा मारल्या.

विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना अनुप म्हणाला की,”यात काहीच वाद नाही की क्रिकेटची लोकप्रियता कबड्डीपेक्षा जास्त आहे. सध्या कबड्डी सरस नाही पण प्रो कबड्डीची सुरुवात झाल्यापासून कबड्डी खेळाची लोकप्रियता खूप वाढली आहे. क्रिकेट सोडला तर कबड्डीने सर्व खेळांना लोकप्रियेत मागे टाकले आहे.”
पुढे बोलताना अनुप म्हणला की,” मी म्हणत नाही की आता कबड्डीची लोकप्रियता क्रिकेट इतकी आहे. पण जर आणखी ४-५ प्रो कबड्डीचे मोसम यशस्वी झाले तर कबड्डीची लोकप्रियता क्रिकेटच्या बरोबरीत येईल. ”

मला खूप अभिमान वाटतो की मला ‘बोनस का किंग’ किंवा ‘कॅप्टन कूल’ म्हणतात, आणि भावी खेळाडूंना मार्गदर्शन करताना त्यांचे प्रशिक्षक त्यांना माझ्यासारखा खेळ करायला सांगतात. याच्या पेक्षा दुसरी मोठी अभिमानाची गोष्ट माझ्यासाठी काही नाही. ”असे अनुप म्हणाला.

Comments
Loading...
%d bloggers like this: