१० पैकी ८ मॅच जिंकणारी हैद्राबादही होऊ शकते आयपीएलमधून बाहेर

हैद्राबाद | काल राॅयल चॅलेंजर बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद सामन्यात हैद्राबादने ५ धावांनी विजय मिळवला. हा सामना जिंकल्यामुळे स्पर्धेत प्ले आॅफमध्ये प्रवेश करण्यासाठीचा सर्वात प्रबळ दावेदार म्हणून या संघाकडे पाहिले जाते.

त्यांनी १० सामन्यात ८ विजय मिळवले आहेत. त्यामुळे त्यांचे गुणही १६ झाले आहेत. तर नेट रणरेट ०.४४८ हा स्पर्धेतील अन्य कोणत्याही संघापेक्षा चांगला आहे.

Read- संपुर्ण यादी- प्रो कबड्डी लिलावासाठी महाराष्ट्राचे हे ४२ खेळाडू आहेत उपलब्ध 

असे असतानाही हा संघ जर सर्व समिकरणे जुळून आली तर स्पर्धेतून बाहेर फेकला जाऊ शकतो.

परंतु त्यासाठी ५ समीकरणे एकाचवेळी जुळून यावी लागतील. ती अशी- 

१. जर हैद्राबाद राहिलेले ४ सामने पराभूत झाला तर

२. मुंबई किंवा राजस्थानने त्यांचे सर्व सामने जिंकले

३. चेन्नईने हैद्राबादला पराभुत केले परंतु पंजाबविरुद्ध पराभूत झाली

४. कोलकाता मुंबईकडून पराभूत झाली परंतु पंजाब, राजस्थान आणि हैद्राबादला पराभूत केले

५. पंजाबने चेन्नईला आणि बेंगलोरला पराभूत केले परंतु कोलकाता आणि मुंबईकडून पराभूत झाले.

एवढी समिकरणे एकाच वेळी जुळून आली तर हैद्राबाद नेट रणरेटवर स्पर्धेतून बाहेर होऊ शकते.

Read- हा आहे आयपीएल २०१८मधील एक सर्वोत्तम कॅच