T20: आल इज वेल! सामना होऊ शकतो !!!

0 386

तिरुअनंतपुरम। आज भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात होणाऱ्या तिसऱ्या आणि निर्णायक टी २० सामन्यात पावसाचा अडथळा येण्याची शक्यता कमी आहे. सामना सुरु व्हायला आता काही मिनिटे बाकी आहेत.

रिमझिम पाऊस मैदानात सुरु असल्याचं बोललं जात आहे. परंतु मैदानात पावसाचे पाणी काढण्यासाठी उत्तम सुविधा आहे. तसेच पाऊस थांबल्यानंतर मैदान १० मिनिटानंतर खेळण्यासाठी तयार होऊ शकते अशी सुविधा करण्यात आली आहे. त्यामुळे सामना होण्याची शक्यता जास्त आहे.

क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनीही सामना होईल असा आशावाद ट्विट करून व्यक्त केला आहे.

भारतीय क्रिकेट बोर्डाच्या अधिकृत ट्विटरवरून मैदानाचा एक खास फोटो शेअर करण्यात आला आहे. आकाशात जरी ढग दिसत असले तरी खेळाडू मात्र सराव करताना दिसत आहे.

या सामन्याचे जवळजवळ सगळे तिकिट्स संपले आहेत. या मैदानात ५० हजार प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे. यातील ४० हजार तिकिटे आधीच विकली गेली आहेत.

हे सुंदर मैदान ठरणार आज भारतातील ५०वे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम !

हे भारतातील ५०वे आंतरराष्ट्रीय मैदान ठरणार आहे जे क्रिकेटचा आंतरराष्ट्रीय सामना आयोजित करणार आहे.

तिरुवनंतपुरम शहरात २५ जानेवारी १९८८ शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना झाला होता. विद्यापीठाच्या मैदानावर हा सामना जेव्हा झाला होता तेव्हा व्हिव्हियन रिचर्ड यांच्या संघाने भारताला येथे पराभूत करत मालिकेत ६–१ असा विजय मिळवला होता.

सध्याच्या भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री हे तेव्हा भारतीय संघाचे कर्णधार होते. त्यानंतर या शहरात कोणताही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना झाला नाही.

येथून केवळ २००किलोमीटर असणाऱ्या कोचीच्या मैदानावर मात्र भारतीय संघ आजपर्यंत ९ सामने खेळला आहे.

केरळ क्रिकेट असोशिएशनच्या संकेत स्थळावर ह्या मैदानाची मालकी केरळ विद्यापीठाकडेच आहे. याची क्षमता ५०००० प्रेक्षकांची असून २४० कोटी रुपये याला खर्च आला आहे.

Comments
Loading...
%d bloggers like this: