हा भारतीय गोलंदाज करू शकतो या सामन्यात एक मोठा विक्रम !

0 48

भारत आणि श्रीलंका या कसोटीमालिकेत अनेक विक्रमांची मांदियाळी लागली. जरी भारत ही कसोटी मालिका जिंकला असला तरी शेवटचा सामना जिंकून ३-० असा विजय मिळवायला भारत नक्कीच इच्छुक असेल. सांघिक विक्रमांबरोबर वैयक्तिक विक्रम देखील या मालीकेत अनेक पहायला मिळाले. अश्याच एका विक्रमाची आणि जादुई आकड्याची बांधणी या कसोटीत होणार आहे.

भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव एका विक्रमाला गवसणी घालण्यापासून अगदी जवळ आहे. सध्या सुरु असलेल्या श्रीलंका आणि भारत यांच्या कसोटी मालिकेत यादवने चांगली कामगिरी केली आहे.

आजपासून या मालिकेच्या शेवटच्या कसोटीला सुरवात होत आहे. या कसोटीत उमेश यादवला आपले कारकिर्दीले १०० बळी पूर्ण करण्याची संधी आहे. आजवर भारताकडून गोलंदाजी करताना २० जणांनी १०० बळींचा आकडा पार केला आहे, त्यात सध्या खेळात असेलेले रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे.

यादव जर १०० बळी पूर्ण करू शकला तर तो २१ वा गोलंदाज ठरेल ज्याने ही कामगिरी केली आहे. यादवने आजवर ३३ कसोटी सामन्यात ९२ बळी मिळवले आहेत.

उमेश यादवची कसोटी आकडेवारी:

कसोटी पदार्पण – नोव्हेंबर २०११ विरुद्ध वेस्ट इंडिज
सर्वोत्तम गोलंदाजी – ५/९३ विरुद्ध ऑस्ट्रेलिया
एकूण बळी – ९२

Comments
Loading...
%d bloggers like this: