केन विलियमसन न्यूझीलंडचा सर्वोकृष्ठ खेळाडू..??

न्यूझीलंडचा २६ वर्षीय कर्णधार व फलंदाज केन विलियमसन याने हॅमिल्टन येथील कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी विक्रमी शतक झळकावले. या मालिकेत न्यूझीलंड संघ हा १-० ने पिछाडी वर आहे त्यामुळे जर न्यूझीलंडला मालिका बरोबरीत सोडायची असेल तर त्यांना तिसरी कसोटी जिंकणे गरजे आहे. तिसरा दिवस अखेर न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनने शतक करत सर्वात जलद सतरा शतके बनवणारा न्यूझीलंडचा फलंदाज बनला, असे करताना त्याने न्यूझीलंडचा दिग्ग्ज फलंदाज मार्टिन क्रॉवेच्या विक्रमाची बरोबरी केली.

केन विलियमसनने संपूर्ण जगाला त्याच्या तंत्रशुद्ध खेळीचा परिचय दिलेला आहेच, तसेच त्याच्या नावावर सर्वात कमी वयात आणि सर्वात जलद सर्व कसोटी खेळणाऱ्य देशांविरुद्ध शतक झळकावण्याचा  ही विक्रम आहे. तसेच त्याच्यानावे न्यूझीलंडकडून एका वर्षात सर्वाधिक धावा करण्याचाही विक्रम आहे. नुकतेच त्याने साऊथ आफ्रिका  विरुद्ध शतक करून आणखी एक विक्रम आपल्या नावे केला आहे, तो आता न्यूझीलंडचा सर्वात जलद पाच हजार धाव करणारा फलंदाज बनला आहे , त्याने ही कामगिरी ११० व्या डावात केली.

मॉडर्न डे फॅब फोर , म्हणजेच कोहली,स्मिथ,रूट आणि विलियमसन, यांचा विचार करता कोहली इंग्लंड मध्ये चांगला खेळ दाखवू शकला नाही, रूट भारतात चांगला खेळ दाखवू शकला नाही, तर स्मिथ ने ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन्ही देशात चांगला खेळ केला आहे, पण विलियमसनने न्यूझीलंड मध्येच नाही तर जग भरात आपल्या बॅटची जादू दाखवली आहे.

न्यूझीलंडचा कर्णधार आजूनही १४८ वर नाबाद आहे आणि त्यांच्याकडे सहा फलंदाज शिल्क असताना तिसऱ्या दिवस अखेर फक्त ७ धावांची आघाडी आहे.

जर न्यूझीलंडला हा सामना जिंकायचा असेल तर त्यांच्या पहिल्या डावातील सफल गोलंदाज मॅट हेनरीला तशीच काहीशी जादू करावी लागेल.