विम्बल्डन: अग्रमानांकित अँडी मरेचा दुसऱ्या फेरीत प्रवेश

विम्बल्डनचा गतविजेता अग्रमानांकित अँडी मरेने कझाकिस्तानच्या ऍलेक्सझांडर बुब्लिकला ६-१, ६-४, ६-२ असे सरळ सेटमध्ये हरवत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

 

अँडी मरेने याआधी २०१३ आणि २०१६ विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले होते. जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या आणि विम्बल्डन मध्ये अग्रमानांकित असलेला मरे विजयासाठीचा एक प्रबळ दावेदार आहे.