विम्बल्डन: गुगलचे खास डुडल

क्रीजगतात अतिशय प्रतिष्ठेची समजली जाणारी विम्बल्डन ही ग्रँडस्लॅम स्पर्धा आज सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर जगातील प्रसिद्ध सर्च इंजिन असणाऱ्या गुगलने खास डुडल बनवले आहे.

जगातील मोठ्या खेळांच्या स्पर्धांच्या पहिल्या दिवशी आजकाल गुगल हे डुडल खास डुडल प्रसिद्ध करते. त्याला विम्बल्डन अपवाद असणे शक्यच नाही.

या वर्षीची स्पर्धा ३ जुलै ते १६ जुलै दरम्यान रंगणार असून हे स्पर्धेचे हे १४० वे वर्ष असून व्यावसायिक टेनिसला सुरुवात झाल्यापासून ही ५० वी स्पर्धा होत आहे.

यावेळी भारताचे रोहन बोपण्णा, लिएंडर पेस, दिवीज शरण, पुरव राजा, जीवन नेदुनचेझियान हे खेळाडू स्पर्धेत खेळणार आहेत.