विम्बल्डन: चार महिन्याची गर्भवती मैंडी मिनेला खेळतीय विम्बल्डन स्पर्धेत

लग्जमबर्गची मैंडी मिनेला ही चार महिन्यांची गर्भवती महिला टेनिसपटू विम्बल्डन स्पर्धेत खेळत आहे. विशेष म्हणजे ही खेळाडू महिला एकेरीत खेळत असून ती गर्भवती असल्याचा खुलासा तिने आज केला आहे.

त्याबरॊबर ती सेरेना विलियम्स और विक्टोरिया अझारेंका सारख्या खेळाडूंच्या यादीत सामील झाली आहे.

मिनेला ही पहिल्याच फेरीत इटलीच्या फ्रांसेस्का शियावोन कडून १-६ १-६ अशी पराभूत झाली आहे. परंतु तिच्या ढिल्या कपड्यामुळे तिच्याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले होते.

मिनेला पत्रकारांशी बोलताना म्हणाली,ह्या मोसमातील ही माझी शेवटची स्पर्धा आहे.” मिनेला ही महिला दुहेरीत अनास्तासिजा सेवास्तोवा सुद्धा खेळणार आहे.
जागतिक क्रमवारीत ८२व्या स्थानी असणाऱ्या मैंडी मिनेलाने काल नवऱ्याबरोबर विम्बल्डनच्या कोर्टवरील एक खास फोटो फेसबुकवर शेअर केला आहे.