विम्बल्डन: भारताच्या दिवीज शरण आणि पुरव राजाची प्रथमच दुसऱ्या फेरीत आगेकूच

विम्बल्डन दुहेरीत भारताच्या दिवीज शरण आणि पुरव राजाने काईल एडमंड आणि जाओ सौसा यांना ७-६ (७/२), ३-६, ६-४, ७-६ (८/६) असे हरवत विम्बल्डनच्या दुसरया फेरीत प्रवेश केला. तीन तासाहून अधिक वेळ चाललेल्या या सामन्यात चार सेटमध्ये काईल एडमंड आणि जाओ सौसा यांचा पराभव केला.

दिवीज शरण आणि पुरव राजा जोडी आजवर एटीपी चॅलेंजर स्पर्धेतली कामगिरी करत आलेली आहे परंतु त्यांना विम्बल्डनच्या पहिल्या फेरीत आजवर विजय मिळवता आलेला नव्हता. या विजयाबरोबर ही जोडी विम्बल्डनमध्ये दुहेरीत विजय मिळवणाऱ्या भारतीय दिग्गज खेळाडूंच्या यादीत जाऊन बसली आहे.

विम्बल्डनमध्ये प्रथम महेश भूपती आणि लिएंडर पेस या जोडीने १९९९ साली विजय मिळवला होता.