विम्बल्डनची मनोरंजक आकडेवारी

0 48

विम्बल्डन आणि प्रतिष्ठा हे शब्द कायम एकत्र घेतले जातात. अशा ह्या स्पर्धेने १४०व्या वर्षात पदार्पण केले आहे. खेळ आणि रेकॉर्ड ह्या जशा विम्बल्डनच्या अविभाज्य अशा गोष्टी आहेत तशाच तेथील अन्य गोष्टीही कायम लक्षवेधी असतात.

असाच काही गमतीशीर आणि मनोरंजक गोष्टींची ही आकडेवारी:

३,३०,००० एवढे कप कॉफी आणि चहा यावर्षी विम्बल्डनमध्ये ह्या वेळी चाहते, खेळाडू आणि आयोजक पिणार आहेत.

३,२०,००० एवढे लिकर किंवा फ्रुट कप ह्यावेळी टेनिस चाहते पिणार.

२,३४,००० एवढ्या जेवणाच्या थाळ्या ह्या स्पर्धेदरम्यान खाल्ल्या जाणार आहेत.

२,३०,००० एवढ्या पाण्याच्या बाटल्या पाणी पिल्या जाणार आहे.

१,१०,००० बिअर या स्पर्धेदरम्यान पिल्या जाणार.

८६,००० एवढ्या आईस क्रीम चाहते खाणार आहेत.

७६,००० सॅन्डविच हा प्रकार या स्पर्धेदरम्यान चाहते खाणार आहेत.

४४,००० लिटर दूध या स्पर्धेदरम्यान चाहते पिणार आहेत.

३०,००० पिझ्झा स्पर्धेदरम्यान खाल्ला जाणार

२९,००० शॅम्पेनच्या बाटल्याचा चाहते आनंद घेणार आहेत.

२८,००० किलोग्रॅम इंग्लिश स्ट्रॉबेरीचा ह्या वेळी चाहते खाणार आहेत.

२५,००० एकप्रकारचा गव्हापासून बनवलेला ब्रेड या स्पर्धेत खाल्ला जातो.

१६,००० माश्याचे भाग आणि चिप्स या वेळी चाहते खाणार

११,००० एवढे डेसर्ट स्पर्धेदरम्यान खाल्ले जाणार आहेत.

Comments
Loading...
%d bloggers like this: