विम्बल्डन: नदाल स्पर्धेबाहेर

दोन वेळचा विम्बल्डन विजेता राफेल नदाल स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याला १६व्या मानांकित म्युलर ५सेट च्या सामन्यात 3-6, 4-6, 6-3, 6-4, 13-15 असे पराभूत केले.

कोर्ट नंबर १ वर झालेला हा सामना तब्बल ४ तास ४८ मिनिटे चालला. स्पर्धेतील हा सर्वाधिक वेळ चाललेला सामना आहे. नदालला स्पर्धेत चतुर्थ मानांकन होते.

या विजयाबरोबर म्युलर प्रथमच विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहचला आहे. त्याचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना मारिन चिलीचशी होणार आहे.