विम्बल्डन: आजचे महत्त्वाचे सामने

आज विम्बल्डन २०१७ स्पर्धेचा ११ वा दिवस असून स्पर्धा अंतिम टप्प्याकडे आली आहे. आज विम्बल्डनमध्ये मुख्य आकर्षण असणार आहे ते १८ वेळचा ग्रँडस्लॅम विजेता रॉजर फेडरर. तो आज उपांत्यफेरीत झेक प्रजासत्ताकच्या टोमास बर्डिच या खेळाडूशी दोन हात करणार आहे.

आजचे महत्त्वाचे सामने

पुरुष एकेरी, सेन्टर कोर्ट
मारिन चिलीच विरुद्ध सॅम क्वेरी, उपांत्यफेरी-१
रॉजर फेडरर विरुद्ध टोमास बर्डिच, उपांत्यफेरी-२

महिला दुहेरी
ऍना लेना ग्रॉइनफेल्ड आणि क्वेटा पेसचॆ विरुद्ध एकातेरिना माकारोवा विरुद्ध एलेना वेसणीना, उपांत्यफेरी-१
हाओ-चिंग चॅन आणि मोनिका निकल्सच विरुद्ध माकोतो निनोमिया विरुद्ध रेनाटा वोरकॉवा, उपांत्यफेरी-२
मिश्र दुहेरी
हेन्री काँटिनें आणि हेअथेर वॉटसन विरुद्ध ब्रुनो सोआरेझ आणि एलेना वेसणीना, उपांत्यफेरी-१
जेमी मरे आणि मार्टिना हिंगीस विरुद्ध मार्सेलो डेमॉलिनेर आणि मारिया जॉसे मार्टिनेझ सांचेझ, उपांत्यफेरी-२

याशिवाय कनिष्ट गट, व्हीलचेअर आणि आमंत्रितांचे सामने होतील.