विम्बल्डनच्या बक्षिशात होणार वाढ

जगप्रसिद्ध टेनिस स्पर्धा विम्बल्डनचे बक्षीस अजून मोठे होणार आहे. ऑल इंग्लंड क्लबने घेतलेल्या निर्णयानुसार यात चांगलीच वाढ होणार आहे. नुक्यातच झालेल्या ब्रेक्झीटच्या वादामुळे पाउंडचा भाव कमी झाला आहे. ऑल इंग्लंड क्लबचे मूळ काम असते अश्या गोष्टींवर लक्ष ठेवणे ज्यामुळे जसे की चलनात होणाऱ्या बदलामुळे होणारे त्रास आणि अश्याच गोष्टी ज्याने आर्थिक बाबींना धक्का बसेल त्या आटोक्यात आणणे व त्यात गरजेनुसार बदल करणे.

 

विम्बल्डन खेळायला येणाऱ्या खेळाडूंना याचे नुकसान होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. २०१६ साली अँडी मरे आणि सेरेना विलियम्स यांनी विजेतेपद पटकावले होते. त्यांना २ मिलियन पाउंड म्हणजेच १६ कोटी ५५ लाख रुपये रोख असे मिळाले होते.

आणि आता नवीन किंवा वाढलेल्या पुरस्काराप्रमाणे २.२५ मिलियन पाउंड म्हणजेच १८ कोटी ६२ लाख इतके करण्यात येईल असे सांगितले जात आहे. २०१५ साली देण्यात येणार्या रकमेपेक्षा ६.४% वाढ २०१६ सालाच्या रकमेत करण्यात आली होती. आता हे मात्र पाहावे लागेल की या रकमेमध्ये नक्की किती वाढ होते आणि अजून काय फेरबदल घडतात.

 

ही पहा इतर क्रीडा प्रकारात मिळणारी रोख रक्कम:

फुटबॉल विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला मिळणारी रक्कम:                              अंदाजे  २२४ कोटी 

क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला मिळणारी रक्कम:                                अंदाजे २५ कोटी ५० लाख

डेव्हिस कप (टेनिसचा विश्वचषक) जिंकणाऱ्या संघाला मिळणारी रक्कम:        अंदाजे  ५७ कोटी