विम्बल्डन: स्टॅन वावरिंकाचा धक्कादायक पराभव

जागतिक क्रमवारीत ३ ऱ्या स्थानी असणाऱ्या स्टॅन वावरिंकाला ४९ व्या डॅनील मेदवेदेवने ४ सेट मध्ये हरवत वावरिंकाचे विम्बल्डन विजयाचे स्वप्न मोडीत काढले.

 

२१ वर्षीय रशियाच्या मेदवेदेवने वावरिंकाला ६-४, ३-६, ६-४, ६-१ असे पराभूत केले. पहिल्या फेरीत बाहेर जावेलागल्यामुळे वावरिंकाच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. आणि या उलट मेदवेदेवने चक्क गुडघे जिमनीला टेकवत सेन्टर कोर्टचे चुंबन घेत आपल्या पहिल्या विम्बल्डन विजयाचा आनंद साजरा केला.

 

PC: Ashley Western (Getty Images)