१० वर्षांत पहिल्यांदाच इंग्लंड- विंडीजमध्ये होतेय अशी मालिका

इंग्लंडचा संघ जानेवारी 2019 मध्ये विंडिज दौरा करणार आहे. या दौऱ्याचे वेळापत्रक विंडिज क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी (31 आॅगस्ट) जाहिर केले आहे.
या दौऱ्यात इंग्लंड विंडिज विरुद्ध तीन कसोटी, पाच वनडे आणि तीन टी20 सामने खेळणार आहे.या दौऱ्याचा कालावधी हा दोन महिन्याचा असणार आहे. त्यामुळे 2009 नंतर पहिल्यांदाच इंग्लंड या मोठ्या कालावधीसाठी विंडिज दौऱ्याला जाणार आहे.
या दौऱ्यात इंग्लंड सुरुवातीला थ्री डब्ल्यूएस ओव्हल मैदानावर चार दिवसीय सराव सामना खेळणार आहे. 

तसेच या दौऱ्यातील कसोटी मालिकेला 23 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. हे तीन सामने अनुक्रमे बार्बाडोस, अँटिग्वा आणि सेंट लूसिया येथे होणार आहेत. विंडिजने याआधी इंग्लंड विरुद्ध 2009 मध्ये कसोटी मालिका जिंकली होती. ही 5 सामन्यांची मालिका विंडिजने 1-0 अशी जिंकली होती.

इंग्लंड 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर 20 फेब्रुवारी पासून 5 सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या वनडे मालिकेतील पहिले दोन सामने बार्बाडोस येथे, तर तिसरा आणि चौथा सामना ग्रेनेडा येथे आणि पाचवा सामना सेंट लूसिया येथे होणार आहे.

या दोन्ही संघासाठी विश्वचषक 2019 स्पर्धेआधी ही शेवटची द्विपक्षीय मालिका असणार आहे. या वनडे मालिकेनंतर5 मार्चपासून तीन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे.

असा असेल इंग्लंडचा विंडिज दौरा-

कसोटी मालिका-

15-18 जानेवारी: सराव सामना, थ्री डब्ल्यूएस ओव्हल, बार्बाडोस.

23-27 जानेवारी: पहिला कसोटी सामना, केनसिंग्टन ओव्हल, बार्बाडोस.

31 जानेवारी – 4 फेब्रुवारी: दुसरा कसोटी सामना, सर विवियन रिचर्ड्स स्टेडियम, अँटिग्वा.

9-13 फेब्रुवारी: तिसरा कसोटी सामना, डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियम, सेंट लूसिया.

वनडे मालिका- 

17 फेब्रुवारी: सराव वनडे सामना, थ्री डब्ल्यूएस ओव्हल, बार्बाडोस.

20 फेब्रुवारी: पहिला वनडे सामना, केनसिंग्टन ओव्हल, बार्बाडोस.

22 फेब्रुवारी: दुसरा वनडे सामना, केनसिंग्टन ओव्हल, बार्बाडोस.

25 फेब्रुवारी: तिसरा वनडे सामना, नॅशनल क्रिकेट स्टेडियम, ग्रेनेडा.

27  फेब्रुवारी: चौथा वनडे सामना, नॅशनल क्रिकेट स्टेडियम, ग्रेनेडा.

2 मार्च: पाचवा वनडे सामना, डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियम, सेंट लूसिया.

टी20 मालिका-

5 मार्च: पहिला टी20 सामना, डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियम, सेंट लूसिया.

8 मार्च: दुसरा टी20 सामना, वॉर्नर पार्क, सेंट किट्स

10 मार्च: तिसरा टी20 सामना, वॉर्नर पार्क, सेंट किट्स

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

तरच टीम इंडिया जिंकणार चौथा कसोटी सामना…

मलिंगाचे एशिया कपसाठी श्रीलंका संघात कमबॅक

एशियन गेम्स: ….म्हणून झाले सुवर्णपदक विजेत्या भारतीय बॉक्सरला अश्रू अनावर

एशियन गेम्स: समारोप सोहळ्यासाठी हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल असणार ध्वजधारक

ड्वेन ब्रावोकडून टी२०त षटकारांची बरसात, केली धमाकेदार खेळी

वाढदिवस विशेष: वेगवान गोलंदाज इशांत शर्माबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी