दुसऱ्या टी20 सामन्यासाठी भारतीय संघात सर्वात मोठा बदल

लखनऊ। भारत विरुद्ध विंडीज संघात आज(6 नोव्हेंबर) दुसरा टी20 सामना होणार आहे. या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच या सामन्यासाठी 11 जणांच्या भारतीय संघात एक बदल करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज उमेश यादव ऐवजी भुवनेश्वर कुमारला संधी देण्यात आली आहे. तसेच विंडीज संघातही एक बदल करण्यात आला आहे. विंडीजच्या 11 जणांच्या संघात पॉवेलच्या ऐवजी निकोलास पूरनला संधी मिळाली आहे.

भारतीय संघ हा सामना जिंकून मालिकेतही विजयी आघाडी घेण्याचा प्रयत्न करतील. तसेच विंडीजचा मालिका बरोबरी करण्याचा प्रयत्न असेल. 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत भारतीय संघ 1-0 असा आघाडीवर आहे.

हा सामना लखनऊमधील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडीयमवर होत असलेला पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय टी20 सामना आयोजीत करणारे हे जगातील एकूण 102 वे तर भारतातील 22 वे मैदान आहे. या मैदानाची एकूण 50 हजार प्रेक्षक बैठकीची क्षमता आहे.

असे आहेत दुसऱ्या टी20 सामन्यासाठी 11 जणांचे संघ:

भारत: रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, रिषभ पंत, मनिष पांडे, दिनेश कार्तिक, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, कृणाल पंड्या, खलील अहमद.

विंडीज: शाय होप, दिनेश रामदीन, शिमरॉन हेटमेयर, किरॉन पोलार्ड, डॅरेन ब्रावो, निकोलास पूरन, कार्लोस ब्रेथवेट, फॅबियन अॅलेन, किमो पॉल, खारी पिअर, ओशान थॉमस.