चक्क स्टंप्सवर बेल्स नसतानाही सुरु राहिला चौथा ऍशेस कसोटी सामना!

कालपासून(4 सप्टेंबर) इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात चौथ्या ऍशेस कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. ओल्ड ट्रॅफर्ट मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात काल एक क्रिकेटमधील दुर्मिळ गोष्ट पहायला मिळाली. हा सामना काल काहीवेळासाठी स्टंप्सवर बेल्स न ठेवता खेळवण्यात आला होता.

या सामन्यादरम्यान काल जोरदार वारा वाहत होता. ज्यामुळे मैदानावरील पंचांनी विना बेल्सचा सामना सुरु ठेवला.

झाले असे का या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील 32 व्या षटकादरम्यान जोरदार वारा वाहू लागला. या हवेमुळे मैदानात प्लॅस्टिकच्या पिशव्याही उडू लागल्या. तसेच बेल्सही स्टंप्सवर टिकत नव्हत्या. त्यामुळे मैदानावरील पंच कुमार धर्मसेना आणि मॅरेस इरास्मस यांनी विना बेल्सचाच सामना पुढे सुरु ठेवला.

पण विना बेल्सचा सामना सुरु ठेवण्याच्या निर्णयाबद्दल इंग्लंडचा कर्णधार जो रुटने पंचांबरोबर चर्चा केली. त्यानंतर काही वेळाने वजनाने जड असणाऱ्या बेल्स आणण्यात आल्या. पण त्याही स्टंम्सवर टिकत नव्हत्या.

स्टंप्सवर बेल्सन ठेवता सामना सुरु ठेवण्याचा निर्णय नियमानुसारच घेण्यात आला होता. नियम 8.5 नुसार जर गरज पडली तर पंच बेल्स न ठेवता सामना खेळवण्याचा निर्णय घेऊ शकतात. जर ते सहमत असतील की बेल्सचा उपयोग होऊ शकत नाही तर ते असा निर्णय घेऊ शकतात.

नियमाच्या अनुसार पंच परिस्थिती सामन्य झाल्यावर पुन्हा बेल्सचा उपयोग करण्याची परवानगी देऊ शकतात. तसेच जर स्टंप्सवर बेल्स नसताना विकेट गेली तर यावर पंच विचार करुन निर्णय घेऊ शकतात.

विना बेल्सचा सामना सुरु ठेवण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी वेस्ट इंडीज आणि अफगाणिस्तान संघात 2017 ला झालेल्या सामन्यातही जोरदार वारा वाहत असल्याने बेल्स काढून टाकण्यात आल्या होत्या.

कालपासून सुरु झालेल्या चौथ्या ऍशेस कसोटीत पाऊस आणि जोरदार वाऱ्याच्या व्यत्ययांनंतर पहिल्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 44 षटकात 3 बाद 170 धावा केल्या आहेत.

त्यांच्याकडून मार्नस लॅब्यूशनेने 67 धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच स्टिव्ह स्मिथही 60 धावांवर नाबाद खेळत आहे. त्याच्याबरोबर पहिल्या दिवसाखेर ट्रेविस हेड 18 धावांवर नाबाद आहे. इंग्लंडकडून पहिल्या दिवशी स्टुअर्ट ब्रॉडने 2 विकेट्स तर क्रेग ओव्हरटॉनने 1 विकेट घेतली आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

संजय बांगर अडकले संकटात, जर ‘असे’ झाले तर बीसीसीआय करणार चौकशी

१५ वर्षांपूर्वीचा विश्वविक्रम मोडत राशिद खानने कसोटी क्रिकेटमध्ये रचला नवा इतिहास

डेव्हिड वॉर्नरला शून्यावर बाद करत ब्रॉडने मोडला अँडरसन, अश्विनचा हा मोठा विक्रम