आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत सॉफ्टहार्ड, विप्रो संघांचा विजय

पुणे । आयडीयाज्‌ अ सास कंपनी यांच्या तर्फे स्वर्गीय अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ आयोजित 15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत सॉफ्टहार्ड संघाने ग्लोबाकॉम संघाचा तर विप्रो संघाने झेन्सर संघाचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.

पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मौदानावर झालेल्या सामन्यात प्रफुल्ल मानकरच्या अफलातून फलंदाजीच्या जोरावर सॉफ्टहार्ड संघाने ग्लोबाकॉम संघाचा 7 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना राहूल कृष्णनच्या 56 धावांसह ग्लोबाकॉम संघाने 20 षटकात 7 बाद 153 धावा केल्या. 153 धावांचे लक्ष प्रफुल्ल मानकरच्या नाबाद 80 धावांसह सॉफ्टहार्ड संघाने केवळ 17.1 षटकात 3 बाद 154 धावा करून सहज पुर्ण केले. 57 चेंडूंत 80 धावा करणारा प्रफुल्ल मानकर सामनावीर ठरला.

दुस-या लढतीत विप्रो संघाने झेन्सर संघाचा 28 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळताना अक्षय जगदाळेच्या 77 धावांसह विप्रो संघाने 20 षटकात 8 बाद 157 धावा केल्या. 157 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भुषण परंदकर व सुशांत सिन्हा यांच्या अचूक गोलंदाजीने झेन्सर संघाचा डाव 20 षटकात 9 बाद 129 धावांवर रोखला. अक्षय जगदाळे सामनावीर ठरला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
ग्लोबाकॉम – 20 षटकात 7 बाद 153 धावा(राहूल कृष्णन 56(48), जुबेल जॉय 22, सागर शेंडे नाबाद 24, श्रीकात कासार 2-25) पराभूत वि सॉफ्टहार्ड- 17.1 षटकात 3 बाद 154 धावा(प्रफुल्ल मानकर नाबाद 80(57), अमित कदम 32, श्रीकांत कासार नाबाद 23) सामनावीर- प्रफुल्ल मानकर
सॉफ्टहार्ड संघाने 7 गडी राखून सामना जिंकला.

विप्रो- 20 षटकात 8 बाद 157 धावा(अक्षय जगदाळे 77(54), विनित वैष्णवी 21(11), मुजम्मिल खान 2-23) वि.वि झेन्सर- 20 षटकात 9 बाद 129 धावा(अकिब पिरझादे 34, सिध्दार्थ जालन 28, भुषण परंदकर 4-19, सुशांत सिन्हा 3-21) सामनावीर- अक्षय जगदाळे
विप्रो संघाने 28 धावांनी सामना जिंकला.