Video: या निर्णयामुळे झाले पंचाचे जोरदार कौतूक!

सेंच्युरियन । आज भारताचा हार्दिक पंड्या आज धावबाद झाला. यावेळी पंचांनी योग्य निर्णय दिल्यामुळे त्यांचे मोठे कौतुक होत आहे.

६८व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिक पंड्याने कागिसो रबडाच्या गोलंदाजीवर फटका मारून धाव घेण्यासाठी धावला. त्यानंतर धाव पूर्ण करताना मात्र त्याने बॅट जमिनीला घासली नाही किंवा त्याचे पायही हवेत होते. त्यामुळे पंचांनी हा निर्णय तिसऱ्या पंचांवर सोपवला.

कोणत्याही सामान्य प्रेक्षकांच्या किंवा मैदानावरील अन्य खेळाडूंच्या ध्यानात ही गोष्ट आली नाही परंतु पंचांनी तत्परता दाखवत निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवला. यावेळी मैदानावर मायकल गॉ पंच म्हणून जबाबदारी पार पाडत होते.

विशेष म्हणजे ह्या विकेटबद्दल दक्षिण आफ्रिकेचे खेळाडूही साशंक होते. अपेक्षा नसतानाही विकेट मिळाल्यामुळे मात्र दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी जोरदार आनंद व्यक्त केला तर मैदानावर कालपासून चांगली फलंदाजी करत असलेल्या कर्णधार कोहलीने चांगलीच नाराजी व्यक्त केली.

तसेच माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी या चुकीला माफ करण्यासारखी नसल्याचे म्हटले आहे.

यामुळे हार्दिकला मात्र सोशल माध्यमांवर चांगलेच ट्रोल करण्यात आले.