भारतीय संघाने ५ बाद २४६वर केला डाव घोषित, लंकेपुढे ४१० धावांचे लक्ष

दिल्ली । येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ५२.२ षटकांत २४६ धावा करत आपला दुसरा डाव घोषित केला. आता श्रीलंका संघासमोर जिंकण्यासाठी ४१० धावांचे लक्ष आहे.

भारताकडून सलामीवीर शिखर धवन (६७), मुरली विजय(९), अजिंक्य रहाणे(१०), चेतेश्वर पुजारा(४९), रोहित शर्मा(५०*), विराट कोहली(५०) आणि रवींद्र जडेजा(४*) यांनी धावा केल्या तर लंकेकडून लकमल, गामागे, परेरा. सिल्वा आणि संदकन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतल्या.

आजच्या दिवसातील २९ षटके बाकी अजून सामन्याचा उद्या शेवटचा दिवस आहे.