तर कोलकाता जाणार आयपीएलमधून बाहेर

कोलकाता | आयपीएल २०१८चे ५ सामने बाकी असुन २ संघ प्ले आॅफमध्ये गेले आहेत तर राहिलेल्या दोन जागांसाठी ५ संघ प्रयत्नशील आहेत.

यात १३ सामन्यात १४ गुण मिळवणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सला प्ले आॅफमध्ये प्रवेश करायचा असेल तर शेवटच्या सामन्यात विजय मिळवावाच लागणार आहे आणि ते शेवटच्या सामन्यात पराभूत झाले तर बाकी संघाच्या कामगिरीवर अवलंबून रहावे लागणार आहे.

जर कोलकाता शेवटच्या सामन्यात हैद्राबादविरुद्ध जिंकले तर-

तर ते १६ गुणांसह थेट प्ले आॅफला पात्र ठरतील. यावेळी नेट रनरेट त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरणार नाही.

जर कोलकाता शेवटच्या सामन्यात हैद्राबादविरुद्ध पराभूत झाले तर-

यावेळी एक किंवा त्यापेक्षा अधिक संघांचे १४ गुण होतील त्यावेळी त्यांना नेट रनरेटवर अवलंबून रहावे लागेल.

जर मुंबई आणि पंजाब त्यांच्या शेवटच्या सामन्यात पराभूत झाले तर कोलकाता थेट प्ले आॅफला पात्र ठरेल.

परंतु जर कोलकाता हैद्राबादविरुद्ध शेवटच्या सामन्यात पराभूत झाले आणि मुंबई आणि बेंगलोर त्यांचे शेवटचे सामने जिंकले तर कोलकाता खराब नेट रनरेटमुळे स्पर्धेतून बाहेर जाईल.

महत्त्वाच्या बातम्या-

ख्रिस गेलच्या मनात धडकी, एबी डिव्हिलियर्स मोडतोय हा विक्रम

प्रो कबड्डी- जाणून घेऊयात लिलवासंदर्भातील सर्व नियमावली

एबी डिव्हिलियर्सला कर्नाटक राज्याचं मुख्यमंत्री करा!

विराट म्हणतोय, स्पायडरमॅनने घेतलेला हा कॅच पाहिला का?

-आयपीएल इतिहासात हा ठरला सर्वात महागडा गोलंदाज