३२ चेंडूत शतकी खेळी करणाऱ्या रिषभ पंतची टी२०त पुन्हा मोठी खेळी

दिल्ली । भारतीय संघाकडून वनडे आणि कसोटीत खेळण्यासाठी आतुर असलेल्या दिल्लीकर रिषभ पंतने पुन्हा सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये तुफानी खेळी केली. त्याने सेनादलविरुद्ध खेळताना ३२ चेंडूत ६४ धावांची खेळी केली.

या खेळी त्याने ११ चौकार आणि १ षटकार खेचला. त्याचा स्ट्राइक रेट या खेळीत तब्बल २०० चा होता. त्याच्या फलंदाजीच्या जोरावर दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद २२५ धावा केल्या.

मैदानात २२६ धावांचा लक्ष घेऊन आलेला सेनादलचा संघ १९.१ षटकांत सर्वबाद २०३ धावा करू शकला. त्यांना २२ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.

या आधीच्या सामान्यातच रिषभ पंतने ३२ चेंडूंत शतक झळकावत टी २० क्रिकेटमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जलद शतक केले आहे. या आधी विंडीजच्या ख्रिस गेलने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर कडून खेळताना २०१३ मध्ये ३० चेंडूत शतक केले होते.

यामुळे दिल्ली संघ पुढच्या फेरीत गेल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.