महिला टी२० विश्वचषकच्या अशा होणार सेमीफायनल

अँटीगुआ | महिला टी२० विश्वचषकाचे साखळी फेरीचे सामने संपले असून २२ नोव्हेंबरपासून उपांत्यफेरीच्या सामन्यांना सुरुवात होत आहे. भारतीय संघ परवा अर्थात १७ नोव्हेंबर रोजीच उपांत्यफेरीत पोहचला आहे.

अन्य संघांमध्ये भारताबरोबर विंडीज, आॅस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघाचा समावेश आहे.

उपांत्यफेरीचे दोन्ही सामने २२ नोव्हेंबर रोजी खेळवले जाणार असून पहिला सामना आॅस्ट्रेलिया विरुद्ध विंडीज असा होणार आहे तर दुसरा सामना भारत विरुद्ध इंग्लंड असा त्याच मैदानावर होणार आहे.

भारत आणि विंडीज साखळी फेरीत एकाही सामन्यात पराभूत झाले नाहीत. दोन्ही संघांनी ४ पैकी ४ सामने जिंकले आहेत. दुसऱ्या बाजूला इंग्लंडने २ तर आॅस्ट्रेलियाने ३ विजय मिळवले आहेत.

अंतिम सामना २४ नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

कसोटीत त्रिशतक करणारा पहिला भारतीय बनण्याची सेहवागने आधीच केली होती भविष्यवाणी

मुंबईकर क्रिकेटर पाकिस्तानला नडला, न्यूझीलंडला कसोटीत मिळवून दिला शानदार विजय

नाद कॅच! ग्लेन मॅक्सवेलने घेतला २०१८मधील सर्वात जबरदस्त कॅच

अशी गोलंदाजी तूम्ही क्रिकेटमध्ये यापुर्वी १००% पाहिली नसेल

त्यावेळी एमएस धोनी बनला चक्क टीम इंडियाचा ड्राइव्हर!