चक दे इंडिया: भारतीय महिला संघ आशिया कप हॉकीच्या अंतिम फेरीत !

0 721

भारतीय महिला हॉकी संघाने आज आशिया कप हॉकी स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात यजमान जपानवर ४-२ ने विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

या सामन्यात भारताकडून गुरजीत कौरने सातव्या आणि नवव्या मिनिटाला गोल करून भारताच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. याबरोबरच नवजोत कौरनेही नवव्या मिनिटाला गोल केला. त्यामुळे भारताची आघाडी ३-० अशी झाली.

परंतु जपानच्या शिहो त्सुजी आणि युई इशिबाशीने प्रत्येकी एक गोल करत भारताची ३-२ आघाडी कमी केली. त्यानंतर भारतीय संघाकडून उत्तरार्धात ३८ व्या मिनिटाला लालरेमसैमीने गोल करून भारताला अंतिम सामन्यात प्रवेश मिळवून दिला.

भारतीय संघाचा अंतिम सामना रविवारी चीनविरुद्ध होणार आहे. याआधी भारतीय संघाने २००४ ला आशिया कप जिंकला आहे तर १९९९ आणि २००९ ला उपविजेतेपद मिळवले आहे. तसेच २००९ मध्ये या स्पर्धेत भारत विरुद्ध चीन असाच अंतिम सामना रंगला होता ज्यात चीनने विजय मिळवला होता.

Comments
Loading...
%d bloggers like this: