विराटने शुभेच्छा दिल्या मिताली राजला, फोटो पोस्ट केला पूनम राऊतचा

काल भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला सोशल माध्यमांवर जोरदार ट्रोल करण्यात आलं. कारणही तसंच होत. विराटने भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजला शुभेच्छा देताना पूनम राऊतचा फोटो पोस्ट केला.

काल मिताली राजने महिला क्रिकेटमध्ये एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूचा मान मिळवला. यापूर्वी महिला एकदिवसीय सामन्यांत कारकिर्दीत सार्वधिक धावा करण्याचा विक्रम हा इंग्लंडच्या शार्लेट एडवर्ड्स नावावर होता. तिने १९१ एकदिवसीय सामन्यांत खेळताना ३८.१६ च्या सरासरीने ५९९२ धावा केल्या होत्या.

या विक्रमाबद्दल मितालीवर मोठ्या प्रमाणावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. त्यात भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचाही समावेश होता. परंतु कोहलीने या शुभेच्छा देताना शतकवीर पूनम राऊतचा फोटो शेअर केला. त्यामुळे सहाजिकच त्याला मोठ्या प्रमाणावर नेटिझन्सच्या रोषाला सामोरे जावे लागले.