महिलांच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेला आजपासून सुरुवात, अशी आहे गटवारी.

पटना येथे आजपासून ६६ व्या वरिष्ठ गट राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद- महिला स्पर्धेला सुरुवात होत आहे. पाटलीपुत्र स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, पटना येथे ही स्पर्धा ११ जुलै ते १४ जुलै २०१९ या कालावधीत होईल.

सदर स्पर्धेची गटावरी जाहीर झाली असून मागील स्पर्धेतील विजेते हिमाचल प्रदेश संघ ‘अ’ गटात आहे. तर उपविजेते रेल्वे संघ ‘ब’ गटात आहे. तर महाराज महिला संघ ‘फ’ गटात असणार आहे. यास्पर्धेत एकूण २३ संघांनी भाग घेतला असून त्याचे ६ गटात विभाजन केले आहे.

महाराष्ट्र संघ गटात विजयी झाल्यास उपउपांत्यपूर्व फेरीत विजयी मिळवून उपांत्यपूर्व फेरीत पोहचल्यास महाराष्ट्र विरुद्ध भारतीय रेल्वे लढत होईल. महाराष्ट्र गटात उपविजयी राहिल्यास उपउपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत पोहचल्यास महाराष्ट्रा समोर हरियानाचे आव्हान असेल.

स्पर्धेची गटवारी:
‘अ’ गट: हिमाचल प्रदेश, बिहार, उत्तराखंड
‘ब’ गट: भारतीय रेल्वे, ओडिशा, जन्मू आणि काश्मीर, विदर्भ
‘क’ गट: हरियाना, आंध्र प्रदेश, दिल्ली, मणिपूर
‘ड’ गट: पंजाब, वेस्ट बंगाल, झारखंड, चंदीगड
‘इ’ गट: उत्तर प्रदेश, छत्तीसगड, पोंडीचेरी, आसाम
‘फ’ गट: केरला, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश