अबब! या महिला संघाने तब्बल ५७१ धावांनी जिंकला वनडे सामना

एसएसीए पीसी स्टेटवाइड सुपर विमेंस ग्रेड 1 सामन्यात नॉर्थन डिस्ट्रीक्टने पोर्ट अॅडलेडला 571 धावांनी पराभूत केले. पहिली फलंदाजी करताना नॉर्थनने 50 षटकांत 3 विकेट्सच्या मोबदल्यात 596 धावा केल्या.

यावेळी नॉर्थनच्या टेगन मॅकफर्लीन, सॅम बेट्स, तॅबिथा सेविल आणि डार्सी ब्राउन या चार फंलदाजांनी शतक केले. तर मॅकफर्लीनने सर्वाधिक असे 80 चेंडूत 136 धावा केल्या. तसेच ब्राउन आणि बेट्स ह्या यावेळी नाबाद राहिल्या. या दोघींनी अनुक्रमे 71 चेंडूत 124 धावा आणि 84 चेंडूत 117 धावा केल्या. त्याचप्रमाणे सेविलने 56 चेंडूत 120 धावांची बरसात केली.

तसेच यावेळी नॉर्थनने 64 चौकार आणि तीन षटकार मारले. तर पोर्टने 75 वाइड बॉल देत एकूण 88 अतिरिक्त धावा दिल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना पोर्टचा संघ 10.5 षटकामध्ये 25 धावांत गारद झाला. तर यावेळी त्यांच्या आठच फंलदाजांनी फंलदाजी केली.

मात्र या विजयाची नोंद जागतिक विक्रमात होऊ शकली नाही. कारण याआधी 2007 मध्ये श्रीलंकेच्या कॅंडी येथिल महिला संघाने पुष्पंदणा विरुद्ध 50 षटकांत चार विकेट्सच्या मोबदल्यात 632 धावा केल्या होत्या. हा सामना कॅंडयन संघाने हा सामना 614 धावांनी जिंकला होता.

महत्त्वाच्या बातम्या:

स्वत:चेच दोन खास फोटो शेअर करत कोहलीने दिला चाहत्यांना हा खास मंत्र

इंग्लंडच्या खेळाडूंचा सराव पहाण्यासाठी चक्क सापानेच लावली हजेरी