एकाही महिला बाॅक्सरला कधीही न जमलेली कामगिरी भारताच्या मेरी कोमने करुन दाखवली

एआयबीए जागतिक महिला बाॅक्सिंग स्पर्धेत शानदार कामगिरी करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. यामुळे तीचे या स्पर्धेतील पदकंही पक्के झाले आहे.

४८ किलो वजनी गटात तीने चीनच्या वू यू हिचा ५-० असा पराभव केला.

त्यामुळे ती उपांत्यफेरीत काय कामगिरी करते यावर तिच्या पदकाचा रंग ठरणार आहे. यासाठी तिचा सामना उत्तर कोरियाच्या की किम ह्यांग मी हिच्याशी गुरूवारी होणार आहे.

यापुर्वी मेरी कोमने जागतिक महिला बाॅक्सिंग स्पर्धेत ६ पदके मिळवली असून हे तिचे ७वे पदक आहे. मेरीने या स्पर्धेत आजपर्यंत ५ सुवर्ण आणि १ रौप्यपदक पटकावले आहे. तिने २०१०मध्ये ४८ किलो वजनी गटात शेवटचे सुवर्णपदक पटकावले होते.

या स्पर्धेतील पदकापुर्वी ती आयरीश बाॅक्सर कॅटी टेलरसह सर्वाधिक पदके मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानी होती.

वाचा महत्त्वाच्या बातम्या- 

तीन मॅचमध्ये ५३८ धावा करणाऱ्या १६ वर्षीय खेळाडूला रैनाकडून गाॅगल भेट

२०११विश्वचषक विजेत्या टीम इंडियातील ३ खेळाडू आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत करणार समालोचन

एबी डिव्हिलियर्सच्या पुनरागमानाबद्दलच हे आहे मोठे वृत्त

Breaking- पहिल्या टी२० सामन्यासाठी टीम इंडियाच्या १२ खेळाडूंच्या नावाची घोषणा

वाढदिवस विशेष- कबड्डीतला धोनी: अनुप कुमार