जसप्रीत बुमराहला टक्कर देण्यासाठी हा चिमुकला सज्ज

भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहची गोलदांजी करण्याची नक्कल पाकिस्तानच्या एका पाच वर्षीय मुलाने केली आहे. त्या मुलाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.

ट्विटर वापरकर्त्याने या मुलाचा बुमराहसारखी गोलंदाजी करतानाचा व्हिडीओ ट्विटवर शेअर केला आहे.

“हा पाच वर्षाचा मुलगा तुझा चाहता असून त्याने तूझी गोलंदाजी आशिया चषकात बघितली होती. तेव्हापासूनच तो तुझ्यासारखी गोलदांजी करण्याचा प्रयत्न करत आहे,” असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.

त्या मुलाच्या व्हीडीयोला उत्तर देत बुमराहनेही ट्विट केले.

“मी जेव्हा लहान होतो तेव्हा मी माझ्या क्रिकेटमधील आदर्श लोकांचे नक्कल करत असे. पण माझ्यासारखी अॅक्शन आजची मुले करत आहे हे बघून विशेष आनंद झाला”, असे बुमराहने ट्विटमध्ये म्हटले आहे.

पाच वर्षापूर्वी आयपीएलमध्ये गोलंदाजीच आपले कौशल्य दाखवणारा बुमराह सध्या आयसीसी वनडे क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. 2016मध्ये वनडेत पदार्पण केल्यावर त्याने आतापर्यंत 41 सामन्यात 72 विकेट्स घेतल्या आहेत.

तसेच सध्या सुरू असलेल्या भारत विरुद्ध विंडीज वनडे मालिकेत पहिल्या दोन सामन्यात बुमराहला आराम दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

दुसरा वनडे सामना टीम इंडियासाठी ठरणार ऐतिहासिक

हरभजनने केले विंडीजच्या फलंदाजाबद्दल मोठे भाकित