पहा: सेहवागने शेअर केलेले रॉजर फेडररचे काही खास फोटो

भारताचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररचे असे काही फोटो केले आहेत की ज्यामुळे सेहवागच्या वाट्याला कौतुक आणि टीका अशा दोंन्ही गोष्टी आल्या आहेत.

सेहवागने ट्विटर या सोशल मेडिया वेबसाइटच्या माध्यमातून रॉजर फेडररचे तीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये एक साम्य आहे ते म्हणजे गाय आणि फेडरर.

तीनही फोटोमध्ये फेडरर गायी या प्राण्यांबरोबर दिसत असून त्यात एकात तो गायीचं दूध काढताना तर दुसऱ्या दोन फोटोत गायी बरोबर टेनिस कोर्टवर उभा असलेला दिसत आहेत.

सेहवाग आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “महान टेनिसपटू रॉजर फेडररचे गो प्रेम पाहून चांगले वाटले”