जागतिक बॅडमिंटन स्पर्धा: साईना नेहवाल, पीव्ही सिंधू दुसऱ्या फेरीत

ऑगस्ट २१ पासून जागतिक बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात होत आहे. भारताच्या दृष्टीने एक चांगली बातमी अशी आहे की भारताच्या दोनही दिग्गज खेळाडू साईना नेहवाल आणि पीव्ही सिंधू यांना स्पर्धेत पहिल्या फेरीत बाय मिळाला आहे.

बाय मिळाल्यामुळे सायनाला दुसऱ्या फेरीत स्वित्झर्लंडची साब्रिना जॅकेट आणि युक्रेनची नताल्या व्होल्तसेख यांच्यातील विजेत्या खेळाडूंशी तर सिंधूला कोरियाची किम हो मिन्ह आणि इजिप्तची हादिया होस्नी यांच्यातील विजेत्या खेळाडूचा सामना करावा लागेल.

ही स्पर्धा पुढच्या आठवड्यात स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे होणार आहे.