बापरे! फिफा विश्वचषक २०१८च्या बक्षिसाची रक्कम ऐकूण तुम्ही थक्क व्हाल!

रशियात सुरू असलेला 21व्या फिफा विश्वचषकातील बक्षीस रक्कम 400 मिलीयन डॉलर एवढी आहे. 32 संघांमध्ये ही बक्षिस रक्कम वाटली जाणार आहे.

अंतिम सामन्यात जो संघ पोहचेल त्याला 9.5 मिलीयन डॉलर ही रक्कम साखळी फेरीत पोहचणाऱ्या संघांना 8 आणि स्पर्धेत भाग घेणाऱ्या संघांना 1.5 मिलीयन डॉलर असे विभागून दिली जाणार आहे.

जो संघ साखळी फेरीतून बाद फेरीत पोहचला पण तेथून बाहेर पडला त्यांना जास्तीचे 4 मिलीयन डॉलर म्हणजे 12 मिलीयन डॉलर दिले जाणार आहेत.

उपांत्यपूर्व फेरीतून बाद झालेल्या संघांना अतिरीक्त 4 मिलीयन डॉलर दिले जाणार आहे. शेवटच्या चार संघांना वेगवेगळ्या रक्कम मिळणार आहे.

तिसऱ्या स्थानासाठी लढणाऱ्या विजयी संघाला 24 मिलीयन डॉलर तर हरलेल्या संघाला 22 मिलीयन डॉलर मिळणार आहेत.

विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला 38 मिलीयन डॉलर आणि दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघाला 28 मिलीयन डॉलर बक्षीस म्हणून दिले जाणार आहे.

खाली दिलेल्या यादीनुसार संघामध्ये बक्षीस रक्कम दिली जाणार आहे 

स्थान                      बक्षीस रक्कम(प्रत्येक संघाला)        एकूण रक्कम

साखळी फेरी              8 मिलीयन डॉलर                       128 मिलीयन डॉलर

बाद फेरी                   9 मिलीयन डॉलर                        72 मिलीयन डॉलर

उपांत्यपूर्व फेरी        14 मिलीयन डॉलर                         56 मिलीयन डॉलर

चौथे स्थान              20 मिलीयन डॉलर                        20 मिलीयन डॉलर

तिसरे स्थान            22 मिलीयन डॉलर                        22 मिलीयन डॉलर

उपविजेता               25 मिलीयन डॉलर                        25 मिलीयन डॉलर

विजेता                   35 मिलीयन डॉलर                         35 मिलीयन डॉलर

एकूण                                                                    400 मिलीयन डॉलर

 

स्पर्धेत झालेल्या खर्चासाठी संघाना अजून 1.5 मिलीयन डॉलर मिळण्याची शक्यता आहे. ही बक्षीस रक्कम स्पर्धा पूर्ण झाल्यावर देणार आहेत.

मागच्या वर्षीच्या तुलनेने बक्षीस रक्कमेत 42 मिलीयन डॉलरची वाढ करण्यात आली आहे.

तसेच संघात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूला बोनस दिला जाणार आहे.