विश्वचषकासाठी संघात जागा न मिळालेल्या रायडू, पंतसाठी ही आहे आनंदाची बातमी

2019 विश्वचषकासाठी सोमवारी(15 एप्रिल) 15 जणांच्या भारतीय संघाची निवड करण्यात आली. या संघात अंबाती रायडू आणि रिषभ पंतला मात्र स्थान मिळाले नाही. असे असले तरी रायडू, पंत आणि नवदीप सैनी हे तीन खेळाडू विश्वचषकासाठी भारताचे राखीव खेळाडू असणार आहेत.

याबद्दल बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, ‘चॅम्पियन्स ट्रॉफी प्रमाणे आम्ही तीन राखीव खेळाडू ठेवले आहेत. रिषभ पंत आणि अंबाती रायडू हे पहिले आणि दुसरे राखीव खेळाडू असतील तर सैनी हा गोलंदाजीसाठी राखीव असेल. त्यामुळे कोणी दुखापतग्रस्त झाले तर गरजेनुसार या तिघांपैकी एकजण भारतीय संघाकडून विश्वचषकात खेळेल.’

याबरोबरच सैनी हा खलील अहमद, आवेश खान आणि दीपक चहर यांच्यासह भारतीय संघाला विश्वचषकादरम्यान नेटमध्ये सराव देण्यासाठी इंग्लंडला जाणार आहे.

याबद्दल बीसीसीआयचे आधिकारी म्हणाले, ‘खलील, आवेश आणि दीपक हे राखीव खेळाडू नसतील. कदाचीत गोलंदाजीच्या बाबतीत त्यांना संधी आहे पण जेव्हा फलंदाजीचा विषय येईल तेव्हा रिषभ किंवा रायडूचा विचार केला जाईल.

सध्या भारतीय खेळाडू आयपीएलमध्ये व्यस्त असल्याने विश्वचषकाआधी यो-यो टेस्ट होण्याची शक्यता कमी आहे.

त्याबद्दल बीसीसीआयचे अधिकारी म्हणाले, ‘खेळाडू सध्या व्यस्त टी20 स्पर्धेत खेळत आहेत. आयपीएल संपली की त्यांना विश्रांतीची गरज आहे. असे नाही की दोन मालिकांमध्ये खूप वेळ आहे आणि तूम्ही परिक्षण करु शकता. जर तूम्ही थकला असाल तर त्याचा निकाल वेगळा येऊ शकतो.’

भारताचा विश्वचषकातील पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिका विरुद्ध होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

२०१९ विश्वचषकासाठी इंग्लंड संघाची घोषणा, जोफ्रा आर्चरला संधी नाही

राजस्थान विरुद्ध विजय मिळवल्यानंतर आर अश्विनने केला भांगडा, पहा व्हिडिओ

एमएस धोनी असताना मी प्रथमोपचार पेटी सारखा आहे – दिनेश कार्तिक