२०१८ साली होणाऱ्या फुटबॉल विश्वचषकाचा विभाजन सोहळा पूर्ण

पुढील वर्षी होणाऱ्या फीफा वर्ल्डकप २०१८ च्या ३२ संघांचे ८ गटामध्ये विभाजनाचा सोहळा काल पार पडला. फीफाच्या गुणतालीकेनुसार ३२ संघांना ४ विभागात विभागले गेले होते. यासाठी माजी दिग्गज खेळाडू डियेगो मॅराडोना, ब्लॅन्स, पेले, कार्लोस पुयोल, रोनाल्डिन्हो आणि फोर्लन यांनी आपली उपस्थिती नोंदवली.

पहिल्या विभागातले ८ संघ हे वर्ल्डकपसाठी पात्र ठरलेल्या संघांमधून गुणतालीकेतले अव्वल ८ संघ होते. त्यांना प्रत्येकी ८ गटामध्ये थेट पहिल्या स्थानावर स्थान देण्यात आले आहे.

त्या संघात रशिया, पोर्तुगाल, फ्रांस, अर्जेंटीना, ब्राझील, जर्मनी, बेल्जियम आणि पोलंडचा समावेश आहे तर बाकी ३ विभागातील ८-८ संघांना प्रत्येक गटामध्ये स्थान देण्यात आले आहे. पहिला वर्ल्डकपचा सामना रशिया आणि सौदी अरेबिया मध्ये होणार आहे. बी गट आणि डी गट सर्वात अवघड गट समजला जातोय.

डी गटामध्ये अर्जेंटीना, आईस्लेंड, क्रोएशिया आणि नायजेरिया चा समावेश आहे. आईस्लेंडने इंग्लंडचा २०१६ च्या युरो स्पर्धेत पराभव केला होता तर क्रोएशियाने सुद्धा युरोमध्ये चांगले प्रदर्शन केले होते आणि नायजेरियाने मैत्रीपूर्ण सामन्यात अर्जेंटीनाचा पराभव केला होता.

बी गटामध्ये रोनाल्डोच्या पोर्तुगाल समोर स्पेनचे तगडे आव्हान आहे. बी गटाचा पहिलाच सामना स्पेन विरुद्ध पोर्तुगाल असा होईल. तर गतविजेत्या जर्मनीचा पहिला सामना मेक्सिको बरोबर असेल. आणि ब्राझीलचा पहिला सामना स्वित्झर्लंड बरोबर आहे.

अंतिम ८ गटाच्या संघांची नावे फीफाने घोषीत केली.

 

फुटबॉल विश्वचषक २०१८ च्या काही खास बाबी:

# इंग्लंड, बेल्जियम, तुनिसिया, पनामा एका गटात

# आइसलँडचा फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम फेरींमधला पहिलाच सामना अर्जेंटिना सोबत

# फुटबॉल विश्वविजेता बनण्यासाठी भिडणार जगभरातील ३२ संघ

नचिकेत धारणकर
(टीम महा स्पोर्ट्स)