फिफा विश्वचषक: इंग्लंड प्रशिक्षकाच्या वेस्टकोटसारखे कोट ‘सोल्ड आउट’

मॉस्को।  रशियात सुरू असलेल्या 21व्या फिफा विश्वचषकात आज उपांत्य फेरीतील दुसरा सामना इंग्लंड विरूद्ध क्रोएशिया असा होणार आहे.

इंग्लंडमधील संघाचे चाहते चांगलेच खूष असून ते प्रशिक्षक गॅरेथ साउथगेट यांच्या वेस्टकोट सारखाच कोट कामावर अभिमानाने घालत आहेत.

तसेच इंग्लंडमधील एम अॅण्ड एस(मार्क्स अॅण्ड स्पेन्सर ग्रुप) हे मोठ्या प्रमाणावर या कोटची विक्री करत आहे. खेळाडूंची जर्सी शिवल्यावर त्यांनी आता साउथगेट यांच्या कोटची प्रतिकृती तयार केली.

इंग्लंडचा संघ उपांत्य फेरीत पोहचल्याने या कोटची मागणी वाढली आहे. कालच रात्री याचे सगळ्या प्रकारच्या मापातील कोट पुर्णपणे विकले गेले आहेत. या निळ्या कोटची किंमत 65 पौंड आहे.

इंग्लंड प्रमाणेच रशियातील एम अण्ड एस या शाखेतीलही सगळे कोट विकले गेले आहेत.

मॉस्कोमधील 25 वर्षीय इवान नोवीकोव या कर सल्लागाराने टिव्हीवर साउथगेट यांना पाहिल्याने हा कोट 50 पौंडला विकत घेतला.

“हा कोट रशियातील कामावर जाणाऱ्या तरूणांना छान दिसेल,” असे नोवीकोवने म्हटले आहे.

ब्लडवाइज कॅन्सर चॅरीटीनेही चाहत्यांनी हा कोट कामावर घालून संघाला सपोर्ट करण्याबरोबरच 5 पौंड दान करावे.

इंग्लडचा संघ सुमारे 28 वर्षांनंतर उपांत्य सामना खेळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

हा देश म्हणतो, फिफा फायनलनंतर दुसऱ्या दिवशी सुट्टी जाहीर करा

फिफा विश्वचषक: उपांत्य फेरीत आज क्रोएशिया लढणार इंग्लंडशी

फिफा विश्वचषक: टिकाकरांपासून वाचण्यासाठी नेमारचे मागच्या दाराने पलायन…