एबी डिवीलिअर्सचे एवढे धक्कादायक वक्तव्य आपण कधी ऐकले नसेल!

मुंबई। 2019 चा विश्वचषक जस जसा जवळ येत आहे तसे अनेक खेळाडूंची विधाने समोर येत आहेत. त्यातच दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिवीलिअर्सने माध्यामांशी बोलताना असे काही विधान केले आहे ज्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसेल.

” विश्वचषक जिंकणे हे माझे अंतिम स्वप्न नाही,” असे तो म्हणाला आहे.

34 वर्षीय डिवीलिअर्स यावर्षी क्रिकेटच्या तीनही प्रकारात खेळला आहे. आत्ताच झालेल्या ऑस्ट्रेलिया विरूध्दच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्याने उत्तम कामगिरी केली आहे. घरच्याच मैदानावर झालेल्या या मालिकेत त्याने 4 अर्धशतकासह एक शतकही केले होते. ही मालिका दक्षिण आफ्रिकेने 3-1 ने जिंकली होती. कसोटी क्रिकेटमध्ये केलेल्या या कामगिरीमुळे असे दिसून येते की त्याला एकदिवसीय विश्वचषकाचा विचार त्याच्या डोक्यातून बाहेर पडला आहे.

” मी एकावेळी फक्त एकाच स्पर्धेचा विचार करतो. विश्वचषक जिंकणे हे माझे मोठे स्वप्न नाही. मी माझे विचार बदलेले आहे. जर विश्वचषक जिंकला तर चांगलेच आहे मात्र नाही जिंकला तर त्याचा माझ्या कामगिरीवर काहीही परिणाम होणार नाही.”

” मी मागच्या मोसमात तीनही प्रकारात खेळलो आहे आणि ते मला आवडलेही आहे. पण यावेळेस मी एकावेळी फक्त एकाच स्पर्धेचा विचार करील.”

डिवीलिअर्स आत्तापर्यंत 2007, 2011 आणि  2015 असे तीन विश्वचषक खेळला आहे. यामध्ये 2015 च्या विश्वचषकात नेतृत्व करताना दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत पोहचली होती. उपांत्य फेरीच्या या सामन्यात न्यूझीलंड त्यांचा 4 विकेट्सने पराभव केला होता.

जून 2017 चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेत डिवीलिअर्सच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेचा संघ साखळी फेरीतच बाद झाला होता. त्यानंतर डिवीलिअर्सने कर्णधार पदाची सुत्रे फाफ डू प्सेसिसकडे सोपवली होती. सध्या फाफ क्रिकेटच्या तीनही प्रकाराचे नेतृत्व करत आहे.

“मी फाफला खूप वर्षापासून ओळखत आहे. तो शाळेच्या काळात मी खेळत असलेल्या संघाचा कर्णधार होता. तो एक उत्तम संघनायक आहे. तसेच कर्णधार म्हणून त्याची कामगिरी प्रशंसनीय आहे.”

सध्याच्या आयपीएलमध्ये डिवीलिअर्स विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील बेंगलोर संघाकडून खेळत आहे. यामध्ये दोघांचे मैदानाच्या आत आणि बाहेर संबंध चांगले आहे. फलंदाज म्हणून या दोघांनी अनेक चांगल्या भागीदाऱ्या रचल्या आहेत. तसेच अनेक विक्रमही आपल्या नावे केले आहेत.

कोहलीच्या नेतृत्वाबद्दल बोलताना तो म्हणाला,” चांगल्या कर्णधाराची फलंदाज म्हणून कामगिरी उत्तम नसली तरी तो संघाला कसे पुढे नेतो हे सगळ्यात महत्वाचे असते. विराटचे प्रयत्न अजूनही चालूच आहेत. सरावाच्या वेळी तो नेहमी आम्हांला प्रोत्साहन देत असतो. कर्णधार आणि उत्कृष्ठ संघनायकाचे हेच एक वैशिष्टय आहे.”

हेनरीच क्लासेन ह्या दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूने डिवीलिअर्सची लक्ष वेधून घेतले आहे. तो सध्या आयपीएलमध्ये राजस्थानच्या संघाकडून खेळत आहे. त्याला स्टिव स्मिथच्या जागी संघात घेतले आहे.

त्याच्याविषयी बोलताना डिवीलिअर्स म्हणाला, क्लासेनसोबत मी सरावाच्या वेळी खेळलो तेव्हा काही टिप्सही घेतल्या होत्या. त्याची सुरूवात काहीशी वाईट होती पण जर त्यात बदल आणले तर नक्कीच फायदा होईल. तसेच त्याचे भविष्य उज्वल आहे.