विश्वचषक २०१९ दरम्यान झाले हे खास चार विश्वविक्रम

इंग्लंड आणि वेल्समध्ये 30 मेपासून सुरु झालेल्या 2019 आयसीसी क्रिकेट विश्वचषकाची रविवारी(14 जूलै) सांगता झाली. यजमान इंग्लंडने या विश्वचषकाचे विजेतेपद मिळवले आणि त्यांचे 44 वर्षांचे विश्वचषक विजयाचे स्वप्न पूर्ण केले. हे इंग्लंडचे पहिलेच विश्वविजेतेपद आहे.

या विश्वचषकातील शेवटच्या क्षणापर्यंत रोमांचकारी झालेल्या अंतिम सामन्यात सुपर ओव्हरही बरोबरी सुटल्यानंतर बाऊंड्रीच्या फरकांच्या आधारावर इंग्लंडने न्यूझीलंडवर मात करुन हे विश्वविजेतेपद मिळवले.

या संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत जवळ जवळ सर्वच संघाच्या अनेक खेळाडूंकडून अनेक विक्रम झाले तर अनेक जूने विश्वविक्रम मोडण्यात आले.

यातील या विश्वचषकात नव्याने रचले गेलेले हे चार विश्वविक्रम – 

– भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा एका विश्वचषकात 5 शतके करणारा पहिला आणि सध्याचा एकमेव खेळाडू ठरला. याआधी एका विश्वचषकात सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम श्रीलंकेच्या कुमार संगकाराच्या नावावर होता. त्याने 2015 विश्वचषकात 4 शतके केली होती.

– ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने या विश्वचषकात सर्वाधिक 27 विकेट्स घेतल्या. त्यामुळे एका विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विश्वविक्रम त्याच्या नावावार झाला आहे. त्याने हा विश्वविक्रम करताना ग्लेन मॅकग्राथने 2007 च्या विश्वचषकात घेतलेल्या 26 विकेट्सच्या विक्रमाला मागे टाकले आहे.

– इंग्लंडचा क्रिकेटपटू जो रुटने या विश्वचषकात 13 झेल घेतले आहेत. त्यामुळे तो कोणत्याही एका वनडे मालिकेत किंवा एका वनडे स्पर्धेत सर्वाधिक झेल घेणारा क्षेत्ररक्षक (यष्टीरक्षक व्यतिरिक्त) ठरला आहे.

– न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने या विश्वचषकात 10 सामन्यात 82.57 च्या सरासरीने 578 धावा केल्या आहेत. त्यामुळे तो एका विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा कर्णधार ठरला आहे. याआधी हा विक्रम माहेला जयवर्धनेच्या नावावर होता. जयवर्धनेने 2007 च्या विश्वचषकात श्रीलंकेचे नेतृत्व करताना 11 डावात 60.88 च्या सरासरीने 548 धावा केल्या होत्या.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

रवी शास्त्रींची उचलबांगडी पक्की? बीसीसीआयने नवीन प्रशिक्षकांसाठी मागवले अर्ज

विश्वचषकातील पराभवानंतर विलियम्सन म्हणाला, सामन्यात कोणीही पराभूत झाले नाही

स्टोक्स खेळत होता इंग्लंडकडून पण वडील देत होते न्यूझीलंडला पाठिंबा