पुणे जागतिक शालेय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेसाठी सज्ज, शुक्रवारपासून सुरूवात

पुणे । महाराष्ट्र शासन, आंतरराष्ट्रीय शालेय खेळ महासंघ व भारतीय शालेय खेळ महासंघ, दिल्लीच्या वतीने जागतिक शालेय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक २० एप्रिल ते २४ एप्रिल २०१८ दरम्यान ही स्पर्धा होणार आहे.

स्पर्धेमध्ये १६ देश सहभागी होणार असून शिवछत्रपती क्रीडानगरी म्हाळुंगे बालेवाडी येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचलनालयाचे सहसंचालक नरेंद्र सोपल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी टीसी प्रेसिडेंट लितीशिया पिकार्ड, नॉरबर्ट केव्हर, आदी उपस्थित होते. शिवछत्रपती क्रीडागरीच्या बॅडमिंटन हॉल मध्ये ही स्पर्धा होणार आहे. प्रत्येक देशाच्या संघामध्ये ५ मुली ५ मुले असे एकूण १० खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, व्यवस्थापक, तांत्रिक अधिकारी यांचा समावेश आहे.

स्पर्धेमध्ये २०० खेळाडू, ६४ प्रशिक्षक, ३२ व्यवस्थापक, ८० पंच व तांत्रिक अधिकारी यांचा समावेश आहे. १८ वर्षाखालील मुले आणि मुलींच्या गटात स्पर्धा होणार आहे.

स्पर्धेमध्ये तुर्की, युएई, क्रोएशिया, बेल्जियम, बल्गेरीया, ब्राझील, चायनीज तैपई, फ्रान्स, चीन, इंग्लड, ग्रीस, झेक रिपब्लिक, जॉर्जिया, इटली, भारत अ संघ, भारत ब संघ आदी १६ संघ सहभागी होणार आहेत.

पत्रकार परिषदेला  महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचलनालयाचे सहसंचालक नरेंद्र सोपल, चंद्रकांत कांबळे, फ्रान्सिस्को, टीसी प्रेसिडेंट लितीशिया पिकार्ड, नॉरबर्ट केव्हर,  शालेय क्रीडा विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार, आनंद व्यंकटेश्वर, उदय साने, स्कुल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाचे गौरव दीक्षित,  विजय संतान  उपस्थित होते. 

स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार दिनांक २० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. तर स्पर्धेचा समारोप आणि पारितोषिक वितरण समारंभ २४ एप्रिल रोजी होणार आहे महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन यांच्याकडे तांत्रिक बाबींची जबावदारी सोपविण्यात आली आहे.

भारतीय अ संघ –
मुले –मन्नेपल्ली तरुण (तेलंगणा), त्रिखा वरुण (हरियाणा), रायकोणवार मोनी मुग्धा (आसाम), पारस माथुर (दिल्ली), रितूपुर्णा बोरा (आसाम) प्रशिक्षक -रोहित सिंग, विशाल गर्जे.
मुली – चिंमरण कालिता (आसाम), निकीता संजय (हरियाणा), प्रेरणा आवळेकर (महाराष्ट्र), शिवप्रिया कल्पराशी (तामिळनाडू), अंजना कुमारी (गोवा), प्रशिक्षक -सोनू सिंग, मयांक कपूर.

भारतीय ब संघ –
मुले – गौतम कुमार (हरियाणा), अनिरुद्ध सिंग खुशवाह (गुजरात), आर्यमन गोयल (मध्यप्रदेश), जोजुला अनिष चंद्रा (तेलंगणा), अर्जुन रहाणे (दिल्ली)
मुली – वर्षा व्यंकटेश (केरळ), अनिषा वासे (मध्यप्रदेश), कोकनट्टी वेण्णला श्री (आंध्रप्रदेश), तनिष्का देशपांडे (महाराष्ट्र), अलिफिया बसारी (कर्नाटक)