टीम इंडियासमोर पाकिस्तानच्या खेळाडूंचा होतो उंदीर, पाकिस्तानी महिलेने व्यक्त केला राग

मँचेस्टर। रविवारी(16 जून) 2019 आयसीसी क्रिकेट विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तान संघात ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तान संघाला 89 धावांनी पराभूत केले. याबरोबरच हा भारताचा वनडे विश्वचषकातील पाकिस्तान विरुद्धचा 7 वा विजय आहे.

पाकिस्तान संघाला या पराभवामुळे चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागत आहे. पाकिस्तान संघाला ट्रोल करणारे अनेक व्हिडिओ तसेच फोटोही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एका जेष्ठ महिलेचा व्हिडिओही चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये या महिलेने पाकिस्तानच्या संघावर राग व्यक्त केला आहे.

1 मिनिट 44 सेंकड्सचा असणाऱ्या या व्हिडिओमध्ये या महिलेने भारतासमोर पाकिस्तानचा क्रिकेट संघ उंदीर बनतो, असे म्हटले आहे. त्याचबरोबर तीने भारताविरुद्ध पराभव स्विकारल्याने संघाबरोबरच देशाचीही बेइज्जती होत असल्याचे म्हटले आहे. तसेच तीने म्हटले आहे संघ जिथेही जातो तेथून पराभूत होऊन येतो.

या महिलेने पुढे असेही म्हटले आहे की भारताविरुद्ध पाकिस्तान नेहमी हारतो. भारतासमोर पाकिस्तानला काय होते माहित नाही. त्याचबरोबर तिने सामनेच न खेळवण्याचे सल्ला दिला आहे. एवढ्यावर न थांबता या महिलेने रागाच्या भरात बॅट, बॉलला आग लावा असेही म्हटले आहे.

या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 5 बाद 336 धावांचा डोंगर उभा केला होता. भारताकडून रोहित शर्माने 140 धावांची शतकी खेळी केली. तर केएल राहुलने 57 आणि कोहलीने 77 धावांची अर्धशतकी खेळी केली. पाकिस्तानकडून मोहम्मद अमिरने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.

त्यानंतर पाकिस्तान संघ फलंदाजीला उतरल्यानंतर  35 षटकात 6 बाद 166 धावांवर असताना पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे पाऊस थांबल्यानंतर पाकिस्तानचा डाव डकवर्थ लूईस नियमानुसार 40 षटकांचा करण्यात आला. तसेच पाकिस्तानसमोर 302 धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते.

त्यानुसार पाकिस्तान पावसाच्या व्यत्ययानंतर फलंदाजीला उतरल्यावर त्यांच्यासमोर 5 षटकात 136 धावांचे अशक्यप्राय आव्हान होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानला 40 षटकात  6 बाद 212 धावाच करता आल्या. पाकिस्तानकडून फखर जमान(62) आणि बाबर आझमने(48) चांगली खेळी केली.

भारताकडून विजय शंकर, कुलदीप यादव आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

अखेर किंग कोहलीच आला पाकिस्तानच्या कर्णधाराच्या मदतीला

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात द्विशतकाबद्दल रोहितच्या मनात सुरु होता हा विचार

मॅचच्या आधी ७ तास पाकिस्तानचे खेळाडू करत होते पार्टी, व्हिडिओ झाला व्हायरल