हिटमॅन रोहित शर्माला हे तीन खास विक्रम करण्याची आज आहे सुवर्णसंधी

मँचेस्टर। आज(9 जूलै) 2019 विश्वचषकात भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात पहिला उपांत्य सामना होणार आहे. या सामन्यातील विजेता संघ थेट अंतिम सामन्यात प्रवेश करणार आहे.

या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला खास विक्रम करण्याची संधी आहे. रोहित या विश्वचषकात शानदार लयीत आहे. त्याने आत्तापर्यंत 8 सामन्यात 5 शतके करताना 647 धावा केल्या आहेत. तो या विश्वचषकातील सर्वाधिक धावा करणाराही फलंदाज आहे.

रोहितला हे विक्रम करण्याची आहे आज संधी – 

– रोहितने जर आज 27 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो एका विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरेल. सध्या हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने 2003 च्या विश्वचषकात 11 सामन्यात 673 धावा केल्या होत्या.

– रोहितने जर आज शतकी खेळी केली तर तो विश्वचषकात 7 शतके करणारा पहिला फलंदाज ठरेल. त्याने या विश्वचषकात 5 आणि 2015 च्या विश्वचषकात 1 शतक केले आहे. त्यामुळे सध्या तो विश्वचषकात सर्वाधिक शतके करण्याच्या यादीत सचिन तेंडुलकरसह संयुक्तरित्या अव्वल स्थानावर आहे. या दोघांचीही विश्वचषकात प्रत्येकी 6 शतके आहेत.

– रोहितने आज जर 24 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो विश्वचषकात 1000 धावांचा टप्पा पार करेल. आत्तापर्यंत हा टप्पा सचिन तेंडुलकर(2278), सौरव गांगुली(1006) आणि विराट कोहली(1029) या भारतीय फलंदाजांनी पार केला आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

व्हिडिओ: कोहली म्हणतो, सामन्याआधी विलियम्सनला या गोष्टीची करुन देणार आठवण!

काय आहे भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे सामन्यांचा इतिहास?

टीम इंडियाने असा साजरा केला एमएस धोनीचा वाढदिवस, पहा व्हि़डिओ